डॉ. दिनेश परदेशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : वैजापूर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब संचेती हाजी अकील शेख अविनाश गलांडे उल्हास ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये डॉ. दिनेश परदेशी यांनी निवडणूक निर्णय अधीकारी ड्रा अरुण जन्हऱ्हाड यांच्या कडे दाखल केला.

त्यामुळे शिंदे गटाचे संजय बोरनारे व डॉ. दिनेश परदेशीं यांच्यात थेट लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपतर्फे या अगोदर दशरथ बनकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर प्रतिकिया देताना डॉक्टर दिनेश परदेशीं यांनी सांगितले,
की माझी उमेदवारी पक्की होऊ द्या, मग सविस्तरपणे मला बदनाम करणाऱ्याना उत्तर देईल मी २००१ पासून वैजापूर शहरसाठी काय केले, आणि मला उमेदवारी मिळू नये. यासाठी १ वर्षात काय काय षडयंत्र रचण्यात आले याचा खुलासा आपण लवकरच करणार आहे असे त्यांनी सांगितले.

१६ नोव्हेंबरपर्यंत नगरसेवक पदासाठी १४० तर नगराध्यक्ष पदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. वैजापूर नगरपालिकेत २५ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहतात व किती माघार घेतात हे स्पष्ट होणार आहे.